परभणी जवळील सायाळा या गावातील रहिवासी असेलेले डॉ.खटिंग यांचे वडील लक्ष्मणराव हे शेतकरी.त्यांनी डॉ.केदार यांना हालाखीच्या परिस्थितीत शिकवुन डॉक्टर केले.आपल्या मुलाने डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करावी,मोठ नाव कमवाव असे वडील लक्ष्मणराव यांनी पाहीलेल स्वप्न डॉ.केदार यांनी पूर्ण केले. एम.बी.बी.एस. डी. ऑर्थो (अस्थी विशारद), बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे विद्यापीठ येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २००३ पासून परभणी येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अस्थीविशारद म्हणून कार्यरत डॉ.केदार यांनी वैद्यकीय सेवेला सामाजिक कार्याची जोड दिली.